पत्रकारांचे हक्काचे आणि स्वतःचे माध्यम
...
आणखी वाचा
तुम्ही पत्रकार आहात का? मग PatrakarSangh.com हे व्यासपीठ खास तुमच्यासाठीच आहे...
करोनामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. त्याला माध्यम क्षेत्राचाही अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर, www.PatrakarSangh.com हे देशभरातील सर्व पत्रकारांसाठी त्यांचे हक्काचे आणि स्वतःचे माध्यम सुरू करण्यात आले आहे.
गाव ते शहर पातळीवरील नवख्या बातमीदारापासून, उपसंपादक ते संपादक पातळीवरील, तसेच निवृत्त ज्येष्ठ पत्रकार - यांपैकी कोणीही यात सहभागी होऊ शकतो/शकते. बातम्या, वृत्तलेख, वृत्तांत, राजकीय किंवा अन्य कोणत्याही ताज्या घडामोडींवरील विश्लेषणपर लेख असे पत्रकारितेशी संबंधित कोणत्याही प्रकारचे लेखन पत्रकार यावर करू शकतात. इथे प्रत्येक पत्रकाराला त्याची स्वतंत्र वॉल असेल आणि त्या वॉलवर तो/ती पत्रकार त्याचे/तिचे आधीचे लेखनही पोस्ट करू शकतात. तुम्ही न्यूज फोटोग्राफर असाल, तर फोटो/व्हिडिओही तुमच्या वॉलवर प्रकाशित करू शकता.
आता तुम्ही म्हणाल, की सोशल मीडिया असताना या माध्यमाचे वेगळेपण काय? तर, या वेगळेपणाचे काही मुद्दे पाहू या.
- महत्त्वाचे म्हणजे, या व्यासपीठावरील लेखनातून लेखकाला पैसे मिळणार आहेत. सुरुवातीला पैसे मिळण्याचे प्रमाण जास्त नसेल; पण जसजसे लेखक आणि वाचक वाढत जातील, तसतशी त्यात वाढ होत जाईल. यातून लगेच पूर्णवेळ उत्पन्नाचं साधन हाताशी येईल, असा दावा नाही; मात्र त्या दिशेने वेगाने वाटचाल नक्की होत जाईल. कारण लॉकडाउनपासून ऑनलाइन वाचनाचे प्रमाण काही पटींनी वाढले आहे, हे तुम्ही जाणताच. (रेव्हेन्यू मॉडेल लवकरच जाहीर केले जाईल.)
- या व्यासपीठावर देशभरातील विविध भाषांतील पत्रकार एकत्र येत आहेत. पत्रकार संघातील प्रत्येक पत्रकाराचा स्वतःचा असा वाचकवर्ग आहे. सर्वांनी एकत्रित येण्याने व्यापक वाचक वर्ग उपलब्ध होत आहे आणि त्यांचा एकत्रित परिणाम मोठा होत जाईल. वाचक इथे त्यांच्या आवडीच्या पत्रकाराला आणि विषयांना फॉलो करून, त्यांच्या लेखनाचे अपडेट्स मिळवू शकतात.
- लेखनाची वस्तुनिष्ठता आणि सत्यता यांवरच या माध्यमाची वाढ आणि प्रसार अवलंबून आहे. आणि या दोन्हींवर चांगल्या पत्रकारांची कायमच निष्ठा असते. त्यामुळे त्यांना त्याबद्दल वेगळे काही सांगण्याची आवश्यकता नाही.
- कोणत्याही लेखनावर कमेंट करण्याचे राइट्सही केवळ नोंदणीकृत वाचकांनाच असतील.
- www.PatrakarSangh.com हा केवळ एक दुवा असून, त्यावर प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी संपूर्णतः संबंधित लेखकाचीच असेल. पत्रकार स्वतःच्या अकाउंटवरून जे काही पोस्ट करतील, ते थेट पब्लिश होईल. त्यामुळे त्याबाबत आवश्यक ती सर्व काळजी स्वतः त्यांनीच घेणे आवश्यक आहे.
- कोणत्याही मजकुराबाबत PatrakarSangh.com कडे तक्रार आल्यास, त्याबाबतची पडताळणी करून, तो मजकूर हटवला जाईल; मात्र हा अपवाद वगळता पत्रकारांनी पोस्ट केलेल्या मजकुराचे संपूर्ण नियंत्रण त्यांच्याकडेच असेल. त्यात कोणताही फेरफार/बदल केला जाणार नाही.
मग सहभागी होताय ना? पत्रकार संघावर दिसणाऱ्या सभासदांना संपर्क करून तुम्ही इन्व्हिटेशन कोड मिळवू शकता. तुमची नोंदणी झाली, की तुम्हीही चांगलं लेखन करणाऱ्या तुमच्या संपर्कातील किमान पाच पत्रकारांना इन्व्हिटेशन कोड पाठवा... आणि हो... इथे येण्यासाठी फक्त पत्रकारांनाच इन्व्हिटेशन कोड पाठवा. अन्य लेखन करणाऱ्यांसाठी
www.ReadingWall.com हे माध्यम उपलब्ध आहे.
चला, एकत्र येऊ या आणि परिस्थितीवर मात करत सकारात्मकतेने पुढे जाऊ या!